Saturday, January 8, 2011

This poem is written on 17th november 2008 timing 00.30 night, those days were initial days of my hostel, we were new to eachother and always used to talk about our family, previous college etc.

उंच आभाळात उडण्यासाठी,
पक्ष्यांना घरटे सोडावेच लागते,
career घडविण्यासाठी का होईना
घर हे एकदा सोडावेच लागते,
roomate बरोबरच्या गप्पांमध्ये
घरचे लोक कायम डोकावत असतात,
जीवाभावाच्या लोकांशिवाय
गप्पा कधीच संपत नसतात,
मेस मधले
रटाळ जेवण जेवताना
जिभेची चव कधीच गेलेली असते,
त्याऐवजी मनात मात्र
आईच्या हाताची चव असते,
college office कुठेही असताना
शाळेतले आवडते शिक्षक
आठवत असतात,
त्यांचा राग किंवा शाबासकी देखील
त्या क्षणी हवेहवेसे वाटतात,
अनोळखी शहराच्या
नवीन रस्त्यांवर जाताना
अचानक ओळखीची गल्ली आठवते
तेथे घालवलेल्या कित्येक क्षणांचा
क्षणार्धात उजाळा देऊन जाते
घराबाहेर जगात असताना
मनात कायम घर असते
अनमोल अशा ह्या घराचे महत्व
घराबाहेर पडल्यावरच कळते.......................

1 comment: